Homeताज्या बातम्याचोपड्यात सावकारीचा जाच; घेतलेल्या कर्जासाठी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धमक्या व शिवीगाळचा...

चोपड्यात सावकारीचा जाच; घेतलेल्या कर्जासाठी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धमक्या व शिवीगाळचा आरोप

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा शहर पोलीस ठाण्यात सावकारी पद्धतीने कर्ज देऊन जास्तीचे व्याज वसुलीसाठी धमक्या देणाऱ्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंणी पंचक येथील तलाठी अरविंद लिलाधर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

*2022 पासून कर्ज-जाच सुरू*

तक्रारदार अरविंद जाधव, वय 33, हे लोंणी पंचक येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कौटुंबिक अडचणीसाठी 7 जानेवारी 2022 ते 5/4/ 2026 दरम्यान संशयितांकडून वेळोवेळी कर्ज घेतले होते. कर्जदारांनी फेड केलेले असूनही जास्तीचे व्याज वसुलीसाठी वारंवार फोन, गुगल पे, फेसबुक मेसेंजरद्वारे संपर्क करून शिवीगाळ व धमक्या दिल्या, असा आरोप तक्रारीत आहे.

*काना हॉटेलजवळ मारहाणीचा प्रयत्न*

14 मे 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता चोपडा येथील काना हॉटेलजवळ वडाच्या झाडाखाली तक्रारदारांना बोलावून संशयितांनी मानसिक त्रास दिला व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदार जिवघेण्या भीतीने जळगाव येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदाराचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला.

*BNS व सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा*

चोपडा शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 274/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 296, 352, 351(2), 351(3), 3(5) तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 39, 45 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

*9 आरोपींविरुद्ध गुन्हा*

या प्रकरणी सुनी उर्फ सुनील प्रकाश शिरसाट, बंटी उर्फ अशोक कैलास मेराठे, कटेरी दिलीप धोरात, स्पेश गोखुल भारोसे, शामकांत भाऊराव जाधव, नरेश कैलास साळुंखे, ज्ञानेश्वर रामदास सोनवणे, निलेश पांडुरंग वाघेरे, मंगल पांडुरण पाटील या 9 जणांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत.

*पुढील तपास सुरू*

या गुन्ह्याचा तपास पोउपनि. योगेश्वर किशोर हिरे हे करत आहेत. तपासाची जबाबदारी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो.नि. पवनकुमार देसले यांच्याकडे आहे.

सावकारीच्या नावाखाली होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला आळा बसावा यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला गती दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!