Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील वर्डी गावातील दोन चोपड्यातील एका आरोपीसह चौघांवर जामनेरात गुन्हा दाखल...

चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील दोन चोपड्यातील एका आरोपीसह चौघांवर जामनेरात गुन्हा दाखल 9.15 लाखांचे बेकायदेशीर HTBT बियाणे जप्त मास्टरमाईंड पोलीसांच्या ताब्यात येणार का ?

मुख्य संपादक विनायक पाटील

जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जामनेर शहरातील एका घरगुती गोदामावर टाकलेल्या छाप्यात 9,15,416/- रुपये किमतीचा संशयास्पद HTBT कापूस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून चोपडा तालुक्यातील 3 आरोपींसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*अशी झाली कारवाई*

दिनांक 4 जून 2026 रोजी परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक श्री. प्रशांत दरेकर यांना जामनेर शहरातील वाकी रोडवरील साईंधाम नगर परिसरात राहणारा आरोपी दीपक राममल चौधरी हा आपल्या घरामध्ये बेकायदेशीररित्या HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा करून ठेवत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती प्राप्त झाली होती.

त्यानुसार पोलीस उप अधीक्षक श्री. प्रशांत दरेकर यांनी पथकासह रात्री 11:45 वाजता संबंधिताच्या घरावर पंचासमक्ष अचानक छापा टाकला. घराची झडती घेतली असता घरातील एका खोलीतून 39 पॅकबंद व 7 उघडलेली अशा एकूण 40 गोण्यांमध्ये साठवून ठेवलेली 1,016 कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली. ‘Diya-4.0 (KDCHH 09 BG II)’ व ‘Krish-45 (KDCH 065 BG II)’ या वाणांचा समावेश असून त्याची एकूण बाजारमूल्य 9,15,416/- रुपये आहे.

*चोपडा तालुक्यातील 3 आरोपी*

तपासादरम्यान जप्त बियाण्यांवर उत्पादक म्हणून ‘गोल्ड किंग बायो जीन्स प्रा. लि., अहमदाबाद’ तसेच विक्रेता म्हणून ‘हायवेल्ड हायब्रीड सीड्स, अहमदाबाद’ असा उल्लेख आढळून आला. मात्र आरोपीकडे सदर बियाण्यांच्या खरेदी, साठवणूक अथवा विक्रीबाबत कोणतेही वैध परवाने, बिले अथवा अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नव्हती.

पुढील चौकशीत आरोपी दीपक चौधरी याने गुलाब आधार पाटील,भूषण भरत पाटील व तुकाराम कोळी यांच्या मदतीने ही बियाणे पिंपरी (ता. धरणगाव) परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे उघड झाले आहे.

सदर प्रकरणी बियाणे निरीक्षक श्री. राजू बळीराम ठेपले यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1) दीपक राममल चौधरी, रा. साईंधाम नगर, जामनेर, 2) गुलाब आधार पाटील, रा. वर्डी, ता. चोपडा 3) भूषण भरत पाटील, रा. वर्डी, ता. चोपडा आणि 4) तुकाराम कोळी, रा. चोपडा यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*कोणत्या कलमांखाली गुन्हा*

आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2003 चे कलम 318(1), 3(5) सह बियाणे नियम 1968 चे कलम 12, बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे कलम 3, 4, 6, 9, बीज अधिनियम 1966 चे कलम 7(डी), अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 7, 8, 9 तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 चे कलम 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*पोलीस अधीक्षकांचे आवाहन*

बेकायदेशीर व प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्री व साठवणुकी विरोधात जिल्हा पोलीस दलाकडून कारवाई पुढेही सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत व प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक श्री. प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!