Homeताज्या बातम्यावनोली येथे मोरांची शिकार करणारे शिकारी बंदुकीसहित जेरबंद पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांच्या...

वनोली येथे मोरांची शिकार करणारे शिकारी बंदुकीसहित जेरबंद पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांच्या धाडसाचे कौतुक

मुख्य संपादक विनायक पाटील

यावल तालुक्यातील वनोली येथिल शेत शिवारात मोरांची शिकार करणाऱ्या दोन शिकाऱ्यांना बंदुकीसह रंगेहाथ पकडण्यात येथील जागरूक शेतकरी आणि पोलीस पाटील यांना यश आले आहे. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.ही घटना रात्री नऊ वाजता घडली. शेतातून बंदुकीच्या गोळीच्या आवाज ऐकू आल्याने वनोली गावातील पोलीस पाटील भरत पाटील यांनी तात्काळ शेत शिवारात धाव घेतली. आवाजाच्या दिशेने जात असताना त्यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. वन विभागाचे अधिकारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.गोळीबाराच्या आवाजाच्या दिशेने जात असताना, पोलीस पाटील, वन कर्मचारी आणि गावातील शेतकऱ्यांनी तीन तास केळीच्या बागेत बसले. त्यानंतर मोठ्या धाडसाने त्यांनी बंदुकीसह दोन शिकाऱ्यांना पकडले. त्यांच्याजवळ शिकार केलेले पाच मृत मोर आढळून आले असून, त्यांची मोटरसायकल  देखिल जप्त करण्यात आली. हे दोन्ही शिकारी यावल तालुक्यातील मारुड येथील असल्याचे समजते.मोराची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना पकडण्यासाठी पोलीस पाटील भरत पाटील यांना वन विभागाचे राऊंड ऑफिसर अतुल तायडे, वनरक्षक जीवन नागरगोजे, वनरक्षक वाघमारे यांनी सहकार्य केले. तसेच, गावातील शेतकरी बाळू पाटील, अनिल सपकाळे, भूषण पाटील, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, विशाल पाटील, धनंजय पाटील, कपिल पाटील, राहुल चौधरी आणि सोपान पाटील यांनीही मोलाची मदत केली.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वनोलीच्या पोलीस पाटील आणि शेतकऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!