Homeताज्या बातम्याधरणगाव पंचायत समिती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांची कारवाई पंटरसह एकास...

धरणगाव पंचायत समिती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांची कारवाई पंटरसह एकास अटक

मुख्य संपादक विनायक पाटील

पंचायत समिती धरणगाव येथे ग्रामीण गृहनिर्माण विभागातील अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३२) आणि त्याचा साथीदार सागर कोळी या खाजगी व्यक्तीने प्रधानमंत्री आवास योजनेचा (ग्रामीण) दुसरा हप्ता जमा करून देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या माहितीनुसार तक्रारदारास २०२४–२५ मध्ये परकुल मंजूर झाला होता. पहिला हप्ता १५ हजार रुपये खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी घराचे काम पूर्ण केले होते. मात्र दुसरा हप्ता न मिळाल्याने त्यांनी पंचायत समितीत चौकशी केली असता अभियंता पाटील यांनी “निधी उपलब्ध नाही” असे सांगितले. त्यानंतर गावातील नागरिकांकडून दुसरा हप्ता मंजूर झाल्याचे समजताच तक्रारदार ८ जुलै २०२५ रोजी पुन्हा पंचायत समितीत गेले. तेव्हा अभियंता पाटील यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान अभियंता पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. सागर कोळी मार्फत ही रक्कम स्वीकारली जाईल, अशी कबुलीही अभियंत्याने फोनवर दिल्याचे निष्पन्न झाले.

या आधारे धरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गु.क्र. ३९१/२०२५, प्रकरण प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अंतर्गत दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी:

पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक हेमंत नागरे, पो.ना. बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आणि सचिन चाटे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!