Homeताज्या बातम्याचोपडा ट्राफिक पोलिसांची ‘गैरवर्तनशाही’ उघड! अवैध वसुली, धमक्या, अंगझडतीने नागरिक त्रस्त

चोपडा ट्राफिक पोलिसांची ‘गैरवर्तनशाही’ उघड! अवैध वसुली, धमक्या, अंगझडतीने नागरिक त्रस्त

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा शहरात ट्राफिक पोलिसांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला असून, सामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कायदा राखण्याची जबाबदारी असलेल्या ट्राफिक पोलिसांकडूनच अवैध वसुली, धमकावणे, अपमानास्पद वागणूक व दडपशाही केली जात असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहेत.

शहरातील वैकुंठधाम परिसरात पोलिसांकडून ठाण मांडून वाहनांची रांग लावली जाते. त्यानंतर वाहनचालकांकडून कथितपणे बेकायदेशीररित्या पैसे मागितले जातात. पैसे न दिल्यास अंगझडती, धमक्या, उद्धट भाषा आणि मानसिक छळ केला जातो. हा प्रकार आता रोजचाच झाला असून, ट्राफिक पोलिसांची भीती शहरात निर्माण झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ट्रॅफिककडे दुर्लक्ष

शहरातील सर्वाधिक वर्दळीचे ठीकान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक दररोज भीषण ट्रॅफिक जाम होत असतो, मात्र याकडे ट्राफिक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही एकही ठोस उपाययोजना किंवा नियोजन करण्यात आलेले नाही.

“ट्रॅफिक नियंत्रणापेक्षा वसुलीवरच पोलिसांचा जास्त भर आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.कुंटणखाणा परिसरात ट्राफिक पोलिसांचा संशयास्पद फेरफटका विशेष म्हणजे, ट्राफिक पोलिसांची ड्युटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असताना कुंटणखाणा परिसरात दिवसातून चार ते पाच वेळा फेरफटका का मारला जातो? असा गंभीर प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

बाहेरील पासिंगची (एमएच-१९ व्यतिरिक्त) दुचाकी किंवा चारचाकी दिसली की, तेथून ट्राफिक पोलिसांना त्यांच्या पण तर कडून फोन केला जातो “दादा, बकरा आला आहे”आणि नंतर त्या वाहनचालकांकडून अवैध वसुली केली जाते, असा आरोप खुलेआम होत आहे.

नागरिकांचा संताप : ‘संरक्षण की छळ?’

पोलिसांचा उद्देश नागरिकांचे संरक्षण करणे असताना, चोपड्यातील ट्राफिक पोलिस छळ करणारे यंत्र बनल्याचा आरोप होत आहे. अवैध वसुली, धमकावणे, अनावश्यक अडवणूक, आणि बेकायदेशीर व्यवसायांना अप्रत्यक्ष पाठबळ—यामुळे पोलिसांची प्रतिमा जनमानसात झपाट्याने मलिन होत आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशनची पाहणी करण्यासाठी आय. जी. साहेब ४ तारखेला चोपड्यात येणार आहेत. यावेळी नागरिकांचे ट्राफिक पोलिसांविरोधात असलेल्या तक्रारींचे निवारण होईल का, हा प्रश्न नागरिकांसमोर उद्भवत आहे.. आतापर्यंत फक्त एकाच कर्मचाऱ्यावर म्हणजेच (लक्ष्मण शिंगाणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली, मात्र इतर संबंधितांवर कारवाई होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

“ट्रॅफिक पोलिसांनी कायदा पाळायचा की कायदा मोडून नागरिकांना त्रास द्यायचा?”जर वेळीच कठोर आणि निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर नागरिकांचा असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: धरणगाव ते टाकरखेडा रेल्वे मार्गावरील खांब क्र. 274/12 ते 274/14 दरम्यान अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेसच्या धडकेने 60 ते 65 वर्षे वयोगटातील एका...

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत चोपडा शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळीच थांबवला. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे परवा रात्रीच्या सुमारास दत्त गुरु मंदिर परिसरात बिबट्या दिसल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

धरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,...

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना...

अमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण, ग्रामस्थ संतप्त

अमळनेर प्रतिनिधी दिलीप पवार   अमळनेर: तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे, डापोरी, रुंधाटी, मठगव्हाण या गावांना जोडणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे पूर्णपणे दुरवस्था...

error: Content is protected !!