Homeताज्या बातम्याचोपडा खूनप्रकरणातील दोन्ही आरोपी 24 तासांत जेरबंद; एलसीबीने मुंबईहून परतणाऱ्या रेल्वेतून घेतले...

चोपडा खूनप्रकरणातील दोन्ही आरोपी 24 तासांत जेरबंद; एलसीबीने मुंबईहून परतणाऱ्या रेल्वेतून घेतले ताब्यात

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: शहरातील धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ झालेल्या प्रदीप राजेंद्र महाजन खूनप्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांत जेरबंद केले आहे. मुंबईला पळून गेलेले आरोपी दादर येथून जळगावकडे रेल्वेने परतत असताना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेतून त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

दिनांक 19/04/2026 रोजी रात्री 09:00 ते दिनांक 20/04/2026 रोजी सकाळी 08:30 वाजेच्या दरम्यान चोपडा ते धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ प्रदीप राजेंद्र महाजन (वय 33 वर्षे, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा चेहरा व डोके अज्ञात हत्याराने ठेचून खून करण्यात आला होता. संशयित आरोपी चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) व निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) यांनी पूर्व वैमनस्यातून संगनमताने हा खून केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात CCTNS नं. 152/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे दि. 20/04/2026 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

*मुंबईत पळाले, रेल्वेतून पकडले*

गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपी तात्काळ पसार झाले होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ते मुंबईला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे, पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ रविंद्र पाटील, पोहेकॉ दिपक माळी, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ विष्णू बिन्हाडे, पोकॉ रावसाहेब पाटील, चापोहेकॉ रिजवान शेख यांचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले.

दरम्यान, आरोपी दादर येथून जळगावकडे रेल्वेने निघाल्याची गोपनीय माहिती मिळाली. मात्र ते कोणत्या रेल्वेत आहेत याची खात्री नसताना, पथकाने नाशिक येथून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसून शोध सुरू केला. नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेतून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पथकाला यश आले.

*पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुली*

आरोपींना चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे आणले असता सुरुवातीला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली नाही. विश्वासात घेऊन पुन्हा चौकशी केली असता, मयत प्रदीप महाजन याने आरोपी विजय भास्कर वैदकर याच्याशी पूर्व वैमनस्यातून वाद झाल्याने खून केल्याची कबुली त्यांनी दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा उपविभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोउनि सोपान गोरे, पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ रविंद्र पाटील, पोहेकॉ दिपक माळी, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ विष्णू बिन्हाडे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोकॉ रावसाहेब पाटील, चापोहेकॉ रिजवान शेख यांच्यासह चोपडा शहर पो.स्टे.चे पो.नि. पवन देसले, पोउनि चेतन परदेशी यांनी आरोपींची गोपनीय माहिती काढून त्यांना 24 तासांत ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!