Homeताज्या बातम्याचोपड्यात पदभार स्वीकारताच पीआय पवन देसले 'ॲक्शन मोड'वर; बनावट विदेशी दारूचा कारखाना...

चोपड्यात पदभार स्वीकारताच पीआय पवन देसले ‘ॲक्शन मोड’वर; बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, तिघांवर गुन्हे

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: चोपडा शहर पोलीस स्टेशनचा पदभार नुकताच स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी पहिल्याच दिवसापासून ‘ॲक्शन मोड’मध्ये येत धडक कारवाई केली आहे. अकुळखेडा शिवारात सुरू असलेल्या बनावट विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 1 लाख 8 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या या वेगवान कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

सविस्तर माहितीनुसार, दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:00 वाजेच्या सुमारास अकुळखेडा शिवार (ता. चोपडा) येथील गिरीराज लॉन्सच्या जवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण बेकायदेशीररीत्या बनावट दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने छापा टाकला.

त्यावेळी तिथे मानवी जीवितास अपायकारक असा बनावट मद्य तयार करून, ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ‘रॉयल स्टॅग’ (ROYAL STAG) या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट दारूची निर्मिती आणि पॅकिंग केली जात असल्याचे उघडकीस आले.

*लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त*

या मोठ्या कारवाईत पोलिसांनी एकूण 1,08,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या साहित्यामध्ये ‘रॉयल स्टॅग’च्या 180 मिली मापाच्या भरलेल्या बाटल्या, 30 लिटर बनावट दारूने भरलेला ड्रम, रॉयल स्टॅग कंपनीच्या तब्बल 2500 रिकाम्या काचेच्या बाटल्या, बाटल्यांना सील करण्यासाठी लागणारे 5000 छोटे व मोठे बूच (सीलिंग कव्हर), दारू बनवण्यासाठी लागणारे 15 लिटर गुळमिश्रित रसायन, पॅकिंगसाठी लागणारे बॉक्स, प्लॅस्टिक नळी, ट्रे आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

*तिघांवर गुन्हे दाखल*

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण रवींद्र शिंपी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 123, 318(4), 336(3), 349, 350(2) सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ब)(क)(ड)(ई)(फ), 67, 83, 86 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात 1) राजवर्धन संजय पाटील (वय 31 वर्षे, रा. थाळनेर दरवाजा, चोपडा), 2) कपिल संजय पाटील (वय 30 वर्षे, रा. बोरोलेनगर 2, चोपडा), 3) रवींद्र दिनकर पाटील (वय 40 वर्षे, रा. अकुळखेडा, ता. चोपडा) या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रवींद्र दिनकर पाटील याने बनावट मद्याच्या बाटल्या विक्रीसाठी बाळगून मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत आहेत. पदभार स्वीकारताच एवढी मोठी आणि धडक कारवाई केल्यामुळे चोपडा शहरात पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या ‘ॲक्शन मोड’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!