Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यात विनापरवाना युरिया खताची तस्करी उघड; कृषी व पोलीस पथकाची संयुक्त...

चोपडा तालुक्यात विनापरवाना युरिया खताची तस्करी उघड; कृषी व पोलीस पथकाची संयुक्त कारवाई, 6.33 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: तालुक्यातील वैजापूर परिसरातून अनुदानित युरिया व रासायनिक खतांची शेजारच्या राज्यात विनापरवाना तस्करी केली जाणार असल्याच्या माहितीवरून कृषी विभाग व ग्रामीण पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत 6 लाख 33 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा यांना मिळालेल्या पत्रानुसार, मौजे वैजापूर मार्गे अनुदानित युरिया व इतर रासायनिक खते अनधिकृतपणे वाहतूक करून शेजारच्या राज्यात तस्करी होणार असल्याची खबर जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार दिनांक 3 मे 2026 रोजी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने सीमावर्ती वैजापूर गावात बिनानंबरच्या ट्रॉलीसह खतांनी भरलेला ट्रॅक्टर पकडण्यात आला.

तपासणीत सदर अनुदानित खत चोपडा येथील माऊली ट्रेडर्स या खत विक्री केंद्रातून अधिकृत पक्क्या बिलाशिवाय भरून विक्रीसाठी नेले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

*कारवाई पथक:*

_कृषी विभाग:_ मोहीम अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा भरारी पथक अविनाश खैरनार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) तालुका कृषी अधिकारी चोपडा आर. एम. पाटील, कृषी अधिकारी पंचायत समिती चोपडा योगिनी सोनवणे, कृषी अधिकारी जि.प. जळगाव राहुल महाजन.

_पोलीस विभाग:_ ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडाचे पो.हे.कॉ. किशोर माळी, पो.कॉ. प्रमोद पवार व पो.कॉ. निलेश पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

*जप्त मुद्देमाल:*

युरिया 75 बॅग – 19,950 रुपये, एस.एस.पी. 20 बॅग – 13,000 रुपये, डी.ए.पी. 5 बॅग – 6,750 रुपये, 20:20:0:13 – 9 बॅग – 21,150 रुपये, नॅनो युरिया 8 बॉटल – 1,800 रुपये, ट्रॅक्टर ट्रॉलीसह – 5,80,000 रुपये. *एकूण किंमत: 6,33,650 रुपये* (सहा लाख तेहतीस हजार सहाशे पन्नास रुपये मात्र).

*आरोपी:*

1) विवेक राजाराम पाटील, मु.पो. चोपडा, ता. चोपडा, जि. जळगाव – माऊली ट्रेडर्सचे संचालक

2) सरद सीताराम पीपलदे, रा. सातपाटी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन

फिर्यादी अविनाश खैरनार यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, भारतीय न्याय संहिता 2023 व The Fertilizer (Movement Control) Order 1973 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*मार्गदर्शक अधिकारी:*

ही कारवाई संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी जि.प. जळगाव पद्मनाथ मस्के व तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) नाशिक उल्हास ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!