Homeशिक्षण-प्रशिक्षणचोपडा फार्मसी येथे सोलर ड्रायर निर्मिती तंत्रज्ञानाचे लोकार्पण व प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या...

चोपडा फार्मसी येथे सोलर ड्रायर निर्मिती तंत्रज्ञानाचे लोकार्पण व प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न मुख्य संपादक विनायक पाटील

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा  ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवसंकल्पना राबविण्यासाठी श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चोपडा, भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई आणि जनशिक्षण संस्थान, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या “सोलर ड्रायर” चा लोकार्पण समारंभ आणि प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव सौ. डॉ. स्मिताताई पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडिया चे प्रबंधक श्री जितेंद्र आढाव, महिला आर्थिक विकास महामंडळ, चोपडा चे व्यवस्थापक श्री सलीम तडवी, जनशिक्षण संस्थान, चोपडा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत साळुंखे व मॅनेजर श्री रवींद्र कुडाळकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सोलर ड्रायर पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांनी सविस्तर सांगितले की, बीएआरसी सोबत करार असलेले एकमेव फार्मसी महाविद्यालय म्हणून हे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. सौर उर्जेचा वापर करून सेंद्रिय उत्पादन व औषधनिर्मिती क्षेत्रातील महिलांना सशक्त बनविणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री जितेंद्र आढाव यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की, “नोकरी शोधण्यापेक्षा स्वयं रोजगार करण्यावर भर द्यावा.” नव्या संकल्पना व तंत्रज्ञानाला बँक कशा प्रकारे मदत करू शकते याची माहिती दिली व महिलांनी स्वावलंबनासाठी पुढाकार घ्यावा असे प्रोत्साहन दिले. श्री सलीम तडवी यांनी शासनाच्या विविध महिला सशक्तीकरण व आर्थिक विकास योजना जसे की मुद्रा योजना, स्टार्टअप स्कीम्स इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली. जनशिक्षण संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शशिकांत साळुंखे व मॅनेजर श्री रवींद्र कुडाळकर यांनी संस्थान राबवत असलेल्या विविध कौशल्य विकास कार्यक्रमाचे महत्व सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, सोलर ड्रायरसारखे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगारासाठी व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल.

सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य व मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष श्रीमती आशाताई पाटील ,सचिव सौ. डॉ. स्मिताताई पाटील व भाभा अनुसंशोधक केंद्राच्या श्रीमती स्मिता मुळे यांचे लाभले.

सोलर ड्रायरचे पूजन व  लोकार्पण नंतर सर्व मान्यवरांनी महिला बचत गटातील महिलांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. रुपाली मिलिंद पाटील व श्री एम. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सत्र सुरू झाले. प्रशिक्षणात सोलर ड्रायर  बनविण्याचे सविस्तर तंत्र, त्याचा वापर व फायदे याची माहिती दिली गेली. महिलांनी व विद्यार्थिनींनी प्रशिक्षणात सक्रीय सहभाग घेत अनेक शंका विचारल्या व मार्गदर्शन घेतले.

सूत्रसंचालन डॉ. संदीप पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. नलिनी डी. मोरे यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. भरत व्ही. जैन, डॉ. मोहम्मद रागीब उस्मान, डॉ. के. सी. पाटील, डॉ. किरण बाविस्कर, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. टी. वाय. शेख, हजेरी विभाग प्रमुख डॉ. सुवर्णलता महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला बचत गटातील महिलांनी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सर्व उपस्थित मान्यवरांचे सत्कार व सन्मान करण्यात आला.

सोलर ड्रायर तंत्रज्ञानामुळे महिलांना घरबसल्या उत्पादन प्रक्रिया सुलभ करण्यास मदत होणार असून, या नवउद्योगातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नती साधता येणार आहे, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून दिला गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!