Homeताज्या बातम्याचोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात प्रथमच भुसार मालाच्या जाहीर लिलावाचा...

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात प्रथमच भुसार मालाच्या जाहीर लिलावाचा शुभारंभ

मुख्य संपादक विनायक पाटील

आज दिनांक १३/१०/२०२५ वार सोमवार रोजी चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार  चंद्रकांत सोनवणे व चोपडा तालुक्याचे माजी आमदार लताताई सोनवणे ह्यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाने चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे गलंगी सबयार्डात लिलावाचा शुभारंभ सभापती नरेंद्र पाटील ह्यांचे हस्ते नारळ फोडून आणि पूजन करून भुसार मालाच्या पहिल्या जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. माल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यांत आला सदर सबयार्डात लिलाव सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे यापूर्वी गलंगी परिसरातील शेतकऱ्यांना आपला भुसार माल विक्रीसाठी अमळनेर, शिरपुर बाजार समितीस घेवून जावा लागत होता. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीवर मोठा खर्च होत असे, तसेच वेळेचाही अपव्यय होत होता. चोपडा बाजार समितीच्या गलंगी सबयार्डात लिलाव सुरू झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून त्यांचा वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून जवळच्या गलंगी सबयार्डात येथे माल विक्री करता येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंद व्यक्त होत आहे. बाजार समितीचे सभापती  नरेंद्र वसंतराव पाटील यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की गलंगी सबयार्डात लिलाव सुरू करणे हे बाजार समितीचे उद्दिष्ट होते.आमदार  चंद्रकांत सोनवणे ह्याचें नैतृत्वाने व मार्गदर्शनाने आज हा दिवस शेतकरी, व्यापारी ह्यांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्व संचालक ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाला आहे. यामुळे गलंगी परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सबयार्डाच्या विकासालाही चालना मिळणार असून भविष्यात येथे अधिक सुविधा उपलब्ध होतील व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला शेतमाल गलंगी सबयार्डात विक्रीस आणावा असे आवाहन केले. तसेच घनःश्याम पाटील , शिवराज पाटील ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर लिलाव शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायकराव चव्हाण, संचालक घनःश्याम पाटील, अनिल पाटील, वसंत पाटील (रावसाहेब),  विजय पाटील, नंदकिशोर पाटील, शिवराज पाटील, मनोज सनेर (विक्की डाँ),  मिलींद पाटील, किरण देवराज, सुनिल जैन, सुनिल अग्रवाल, नितीन पाटील  भरत पाटील व सचिव  रोहिदास सोनवणे, कर्मचारी वर्ग तसेच गलंगी परिसरातील मान्यवर शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!