Homeताज्या बातम्याचोपडा शहर पोलीसांनी सराईत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस शिरपूर येथून केली अटक

चोपडा शहर पोलीसांनी सराईत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस शिरपूर येथून केली अटक

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा शहरातील सेवानिवृत्त नागरीक विजय नारायण बाविस्कर, वय ६९ वर्ष, राहणार देशमुख नगर, यावल रोड, चोपडा यांचे राहते घरी दिनांक २९/०९/२०२५ च्या रात्री ११:०० ते दिनांक ३०/०९/२०२५ चे पहाटे ०५:०० वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने घरफोडी करुन घरातील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरी केला होता. त्याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५५२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३०(२), ३३१, ३३१ (४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करुन तपास चालु करण्यात आला होता.

गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना चोरीस गेलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक माहितीच्या आधारे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोउपनि चेतन परदेशी व पथकाने दोन ते तीन दिवस शिरपुर परिसरात सापळा लावून आरोपीचा शोध घेतला. तपासाअंती आरोपी नामे प्रकाश विजय पावरा, वय २८ वर्ष, रा.तोरणमाळ, ता.धडगाव, जि. नंदुरबार याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यास दिनांक १२/१०/२०२५ रोजी शिरपुर शहरातुन ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी हा घरफोड्या व चोरी करणारा सराईत आरोपी असुन त्याचेवर यापूर्वी शहादा पोलीस स्टेशन व दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे १० ते १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दोंडाईचा येथे एका वकीलाचे घरफोडी करुन चोरी केली होती. तसेच शहादा येथील कोर्टाचे तत्कालीन न्यायाधिश यांच्या शासकीय निवासस्थानी देखील त्याने घरफोडी केली होती. सदर गुन्हयांमध्ये त्याला पुर्वी अटक देखील करण्यात आलेली आहे.

सदर आरोपी कडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्याचेकडुन चोपडा येथील घरफोडी मधील खालील नमुद मुद्देमाल शिरपुर येथुन हस्तगत करण्यात आला आहे.

१)१००००/- रुपये किंमतीच्या २ सोन्याच्या अंगठ्या व २ बेन्टेक्सच्या नकली अंगठया जु.वा.कि.अ.

२)२००००/- रुपये किंमतीची सोन्याची गळ्यातील साखळी गोप सारखी दिसणारी त्यात M इंग्रजी

अक्षर षटकोणाकृती आकाराची जु.वा.कि.अ.

३) ३०००/- रुपये किंमतीचा टेक्नोस्पार्क गो कंपनीचा अँड्राइड मोबाईल त्यात जिवो कंपनीची सिम

४)१००००/- रु. किंमतीची ३ ग्रॅम सोन्याच्या गोल रींगा (बाळया). जु.वा. किं.अं.

५)१०००/- रु. किंमतीची ३ भार वजनाचे चांदीची गळयातील चैन. जु.वा. किं.अं.

६)७००/- रु. किंमतीची २ भार वजनाचे पायातील पैंजण. जु.वा.किं.अं.

७) ६००००/- रु. किंमतीची यमाहा कंपनीची YBR ११० हि दुचाकी वाहन क्र. MH १८ AF ९५८२.

एकुण १,०४,७००/- रुपये,

वरीलपैकी काही मुद्देमाल हा चोपडा येथे जुन महिन्यात झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने दाखल असलेल्या गु.र.नं. ३५२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३३१(३), ३०५ (अ) यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे दागिने हे आरोपीने वाघबडली, ता.शिरपुर, जि. धुळे शिवारात एका शेतामध्ये यमाहा YBR११० या मोटारसायकल मध्ये लपवुन ठेवले होते. त्यामुळे सदर मोटारसायकल तेथुन जप्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले २ घर फोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे.

सदर कामगिरी ही  महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक, जळगाव व श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव परीमंडळ ,अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउपनि चेतन परदेशी, पोहवा ज्ञानेश्वर जवागे, पोशि मदन पावरा, पोशि अजिंक्य माळी, पोशि योगेश पाटील, पोशि विलास पारधी यांनी पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि चेतन परदेशी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: धरणगाव ते टाकरखेडा रेल्वे मार्गावरील खांब क्र. 274/12 ते 274/14 दरम्यान अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेसच्या धडकेने 60 ते 65 वर्षे वयोगटातील एका...

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत चोपडा शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळीच थांबवला. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे परवा रात्रीच्या सुमारास दत्त गुरु मंदिर परिसरात बिबट्या दिसल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

धरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,...

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना...

अमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण, ग्रामस्थ संतप्त

अमळनेर प्रतिनिधी दिलीप पवार   अमळनेर: तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे, डापोरी, रुंधाटी, मठगव्हाण या गावांना जोडणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे पूर्णपणे दुरवस्था...

error: Content is protected !!