Homeताज्या बातम्याचोपडा शहर पोलिसांच्या कारवाईत सात सराईत गुन्हेगार जेरबंद १३ लाख १० हजार...

चोपडा शहर पोलिसांच्या कारवाईत सात सराईत गुन्हेगार जेरबंद १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा शिरपूर बायपास रोडवर मध्यरात्री प्राणघातक हत्यारांसह रस्तालुटीच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले आहे.

दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन लोड केलेले गावठी कट्टे, दोन तलवारी, एक रिकामे मॅगझीन, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नांदेड, वैजापूर (संभाजीनगर) आणि चोपडा येथील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिरपूर बायपास रोडवर एका पांढऱ्या रंगाच्या संशयास्पद गाडी (स्विप्ट डिझायर क्र. MH २६ CH १७३३) बद्दल गोपनीय माहिती मिळाली. या गाडीत काही इसम बराच वेळ थांबलेले होते. माहितीची खात्री करताच,  साळवे यांनी तात्काळ एक पोलीस पथक तयार करून संशयित गाडीचा शोध सुरू केला.रणगाडा चौकाच्या थोडे पुढे, बायपास रोडच्या बाजूला ही कार थांबलेली दिसली. गाडीच्या बाहेर दोघेजण परिसरावर पाळत ठेवत उभे होते, तर पाच जण आत बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आधीच सावध असलेल्या पोलीस पथकाने घेराव घालून सातही जणांच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

१. दिलीपसिंघ हरीसिंघ पवार (वय ३२, रा. नांदेड)

२. विक्रम बाळासाहेब बोरगे (वय २४, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर)

३. अनिकेत बालाजी सुर्यवंशी (वय २५, रा. नांदेड)

४. अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड (वय २५, रा. नांदेड)

५. सद्दामहुसेन मोहंम्मद अमीन (वय ३३, रा. नांदेड)

६. अक्षय रविंद्र महाले (वय ३०, रा. चोपडा)

७. जयेश राजेंद्र महाजन (वय ३०, रा. चोपडा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले सर्व आरोपी नामचीन आणि धोकादायक गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी नांदेड, वैजापूर (जि. संभाजीनगर) आणि चोपडा येथे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे, तसेच अग्निशस्त्रे (गावठी कट्टे) व तलवारी बाळगणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपी दिलीपसिंघ पवार याच्यावर खुनासह ७ गंभीर गुन्हे, तर अनिकेत सुर्यवंशी याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी अशा तब्बल १४ गुन्ह्यांची नोंद आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी विक्रम बोरगे हा वैजापूर येथील दरोडा व आर्म्स अॅक्टच्या गुन्ह्यात फरार होता. यातील दोन आरोपी नुकतेच एमपीडीए (MPDA) कायद्यान्वयेच्या स्थानबद्धतेतून बाहेर आले होते. चोपडा येथील आरोपी अक्षय महाले याच्यावरही पूर्वी अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी व दंगलीचा गुन्हा दाखल आहे.

प्राथमिक तपासात या आरोपींची एक विशिष्ट गुन्हेगारी पद्धत समोर आली आहे. हे आरोपी नांदेड परिसरात लोकांमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून दहशत माजवत असत. खंडणी वसुल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे, इतकेच नव्हे तर लोकांना विवस्त्र करून त्यांचा छळ करणे व त्याचे व्हिडीओ बनवून इतरांना घाबरवण्यासाठी वापरणे, असे धक्कादायक प्रकार हे आरोपी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी, सातही आरोपींविरुद्ध संगनमताने दरोड्याची तयारी करून सशस्त्र स्थितीत जमल्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ५८१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) (दरोड्याची तयारी), ३१०(५), शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आले असून, त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकों हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, पोकों अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, चालक पोहेको किरण धनगर, योगेश पाटील, आणि प्रकाश ठाकरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: धरणगाव ते टाकरखेडा रेल्वे मार्गावरील खांब क्र. 274/12 ते 274/14 दरम्यान अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेसच्या धडकेने 60 ते 65 वर्षे वयोगटातील एका...

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत चोपडा शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळीच थांबवला. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे परवा रात्रीच्या सुमारास दत्त गुरु मंदिर परिसरात बिबट्या दिसल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

धरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,...

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना...

अमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण, ग्रामस्थ संतप्त

अमळनेर प्रतिनिधी दिलीप पवार   अमळनेर: तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे, डापोरी, रुंधाटी, मठगव्हाण या गावांना जोडणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे पूर्णपणे दुरवस्था...

error: Content is protected !!