Homeताज्या बातम्यासोनवद बाभुळगाव रस्तावर खड्ड्यांमुळे एक निष्पाप तरुणाचा बळी, सोनवद बाभूळगाव  रस्त्याला अतिक्रमणाचा...

सोनवद बाभुळगाव रस्तावर खड्ड्यांमुळे एक निष्पाप तरुणाचा बळी, सोनवद बाभूळगाव  रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा 

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,

धरणगाव : तालुक्यातील सोनवद बाभुळगाव रस्त्याचे अतिशय बिकट अवस्था ही झालेली आहे.  या रस्त्याला रोज शंभर ते दीडशे वाहनांची दिवसभर वर्दळ हे सुरू असते. या रस्त्याचा शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल हा मिळत असतो परंतु शासनाला महसूल देणाऱ्या रस्त्याची मोठी दूरावस्था ही सध्या झालेली आहे. चमगाव व बाभूळगाव येथून शासनाने वीटभट्ट्यांसाठी माती उत्खननाचे परवाने हे दिलेले असतात. परंतु सोनवद ते बाभुळगाव या रस्त्यावर खूप  मोठ मोठी खड्डे पडलेली आहेत पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून  वाहन धारकांना खड्ड्यांचे अंदाज न आल्यामुळे बरेच छोटे-मोठे अपघात हे घडलेले आहेत. 12 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाभुळगाव  येथील दोन तरुण बांभोरी येथील केबी एक्स कंपनीमध्ये कामाला जात असताना सोनवद गावाजवळ रस्त्याने जात असलेल्या मातीच्या भरलेले ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात मोठा अपघात झाला अपघात एवढा भीषण होती की यात एकनाथ दयाराम मराठे वय 22 वर्ष या तरुणाच्या दुर्दैवाने जागीच मृत्यु झाला. मयत एकनाथ हा एकुलता एक मुलगा होता काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तो त्याच्या आई सोबत बाभुळगाव  येथे मामांच्या गावी वास्तव्यास होता घरातील कर्ता मुलगा गेल्यामुळे परिवारावर दुःखाच्या डोंगर कोसळलेला आहे. या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककडा पसरली आहे.

एवढा मोठा अपघात होऊनही संबंधित विभागाला जाग आलेली नाही. या रस्त्यामुळे अजून अपघात होण्याची वाट संबंधित विभाग बघत तर नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. सोनवद ते बाभूळगाव या रस्त्यावर बाभूळगाव , चमगाव, अहिरे या तीन गावांना धरणगाव जाण्यासाठी या रस्त्यावरून नेहमी प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर  सोनवद ते अहिरे दरम्यान 25 ते 30 विट भट्ट्या आहेत या विट भट्ट्यांनी रस्त्यावर मोठे अतिक्रमण केलेली आहेत तसेच या रस्त्यावर मोठी वर्दळ असल्यामुळे असलेल्या अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण करावे व रस्ता रहदारीस मोकळा करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे संबंधित विभाग याबाबत काय कार्यवाही करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे. हा रस्ता सध्या मृत्यूच्या सापळा बनलेला आहे संबंधित विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या नवीन डांबरीकरणाला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांनी बाभुळगाव ते सोनवद या रस्त्याच्या प्रश्न लक्ष घालून मार्गी लावावा अशी मागणी बाभूळगाव चमगाव अहिरे येथील नागरिकांनी मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेबांकडे केलेली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!