Homeताज्या बातम्यानारोद येथे मोठया भावाने केला लहान भावाचा खून,घरगुती त्रासाला कंटाळून भावाला संपविल्याची...

नारोद येथे मोठया भावाने केला लहान भावाचा खून,घरगुती त्रासाला कंटाळून भावाला संपविल्याची मोठ्या भावाची कबुली

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील नारोद येथील किरण पानाचंद पाटील(27) याने लहान भाऊ  रोहन पानाचंद पाटील याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना दि 21 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.आई वडील व घरातील सदस्यांना मयत रोहन त्रास देत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली आरोपी किरण पाटील याने पोलिसांना दिली असून पोलिसांनी किरण ला ताब्यात घेतले आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

       तालुक्यातील नारोद येथील रहिवासी असलेला रोहन पाटील हा दि 21 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास नारोद येथील गूळ नदी पात्रात संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आला. यात मयत रोहन च्या डोक्याला, गळ्याला तसेच पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले.गावकऱ्यांनी सदर घटना नारोद-खरदचे पोलीस पाटील विजय पाटील यांना  सांगितली.त्यानंतर त्यांनी अडावद पोलिसांना सदर घटना कळवली.अडावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली चोपडा डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटना स्थळी भेट दिली.तिथून तपासाची चक्रे फिरली आणि घटनेच्या काही तासातच घटनेचा तपास पोलिसांनी लावला.

*****  स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा***

रोहन ची हत्या झाली माहिती मिळताच जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे व त्यांची टीम नारोदला दाखल झाली त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यात त्यांनी मयत रोहनचा मोठा भाऊ किरणला विचारले की तुझ्या चेहऱ्याला काटेरी जखमा कश्या झाल्यात. यावर किरण ने सांगितले. काम करतो त्यातून लागल्या परंतु पोलिसांनी त्याला दाखविल्या आणि त्यानेच रोहनची हत्या केल्याची कबुली दिली. आणि आरोपी किरणला ताब्यात घेतले.

******** असा घडला गुन्हा -*********

मयत रोहन हा नशा करून आई वडील भावाला शिवीगाळ करत होता. घरात रोज वाद  घालत असत. या सर्व घटनेला घरातील सर्वच कंटाळले होते. यात दि 20 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आरोपी किरण ने लहान भाऊ मयत रोहनला पाच हजार दिले त्यातून रोहन ने दारू पिली. याची संधी साधत किरणने नारोद परिसरातील गुळी नदी वरील फुलावरून रोहनला ढकलले. यात रोहन जखमी झाला. यात किरणने जखमी रोहन च्या डोक्यात दगड टाकला आणि त्याची हत्या केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!