Homeताज्या बातम्याजळगावात पेट्रोल-डीझेल टंचाईची अफवा पसरवू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगावात पेट्रोल-डीझेल टंचाईची अफवा पसरवू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील

जळगाव: जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गोंधळ निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हा प्रशासन स्पष्ट करते की, जळगाव शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची पेट्रोल/डिझेल टंचाई निर्माण झालेली नाही.

पेट्रोल/डिझेल इंधन पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत आहे व संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. तरी नागरिकांनी खालील बाबींची विशेष दक्षता घ्यावी :

– कोणत्याही अप्रमाणित अफवा, सोशल मीडियावरील चुकीचा संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.

– नाहक भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल/डिझेल खरेदी करू नये.

– पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी व वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था विषयक परिस्थितो निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

– इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर विश्वास ठेवावा.

– अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

– कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.

जिल्हा प्रशासन नागरिकांना शांतता, संयम व सहकार्य राखण्याचे आवाहन करीत आहे. सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खात्री बाळगावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!