Homeताज्या बातम्याधरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत...

धरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

मुख्य संपादक विनायक पाटील

धरणगाव: तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धरणगाव पोलिसांनी मुख्याध्यापक नंदलाल नारायण मराठे याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी धरणगाव तालुक्यातील एका गावातील जि.प. शाळेत इयत्ता चौथीत शिकते. आरोपी मुख्याध्यापक शाळा भरण्यापूर्वी सकाळी 10 वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने मुलीला शाळेत लवकर बोलावून घेत असे. शाळेत कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यावर अत्याचार करत होता. तिला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याचाही आरोप आहे.

पीडितेने विरोध केल्यास आरोपी तिला मारहाण करायचा व “आई-वडील मरून जातील” अशी धमकी देऊन गप्प बसवायचा. उन्हाळी सुट्टीत मावशीकडे गेल्यावर मुलीची तब्येत बिघडली व तिने जेवण बंद केले. नातेवाईकांनी विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

शाळेच्या शेवटच्या दिवशी, 30 एप्रिल रोजीही आरोपीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात विविध कलमांसह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणीहोत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!