Homeताज्या बातम्याचोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत चोपडा शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळीच थांबवला. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेऊन विवाह रोखत दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन केले.

पोलिसांना शहरात एका ठिकाणी बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पो. नि. पवन देसले, पीएसआय युवराज वाळुंज, पो. कॉ. विलास पारधी व पो. कॉ. निलेश वाघ यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन विवाह रोखला. चौकशीत मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून बालविवाहाच्या कायदेशीर परिणामांची जाणीव करून दिली. विवाहाच्या वेळी मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे कायद्याने बंधनकारक आहे. या वयापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा विवाह हा कायदेशीर गुन्हा आहे, असे पोलिसांनी सांगितले.

बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार, बालविवाह करणे, लावून देणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. बालविवाह करणारे वर-वधू, त्यांचे पालक, नातेवाईक, लग्न लावणारे भटजी, पत्रिका छापणारे, मंगल कार्यालय व्यवस्थापक, केटरर्स आणि उपस्थित असणारे सर्वजण दोषी मानले जातात.

“बालविवाह हा सामाजिक दुष्परिणामांसोबतच कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी,” असे आवाहन पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!