Homeशिक्षण-प्रशिक्षणस्वतः उत्तम नागरिक बनने म्हणजे देशसेवा* ...

स्वतः उत्तम नागरिक बनने म्हणजे देशसेवा* दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “हरघर तिरंगा

मुख्य संपादक विनायक पाटील

अभियानांतर्गत सनपुले आश्रमशाळेत संविधानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दिनांक १४ ऑगस्ट वार गुरुवार रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा देवगड येथील प्राथमिक शिक्षक तथा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आधार पानपाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.त्यांच्या हस्ते आजचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी ताराचंद जयसिंग पाटील, सांस्कृतिक समिती प्रमुख ज्ञानेश्वर पाटील,विष्णू यशवंत कोळी,भूषण ज्ञानेश्वर पाटील, प्रवीणचंद्र लक्ष्मण केदारे, गजानन पंडित पाटील,मिलिंद तुळशीराम पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली. अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आठवी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी संविधानातील अनेक कलमांबाबत उहापोह केला.मी स्वच्छता केली तर माझा परिसर स्वच्छ राहील,माझे गाव स्वच्छ राहील आणि माझा देश स्वच्छ होईल.त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत ही भावना प्रत्येक भारतीयाने अंगीकारली तर आपल्याला उत्तम नागरिक होता येईल आणि यातून राष्ट्र प्रगती साधेल. प्रत्यक्ष सीमारेषेवर जाऊनच लढले म्हणजे देशसेवा असा विचार न करता जबाबदार नागरिकाप्रमाणे आपले आचरण असावे.आपले हक्क मागण्यासाठी आपण रस्त्यावर जरूर उतरावे पण कायदा मोडेल हे चालत नाही? राष्ट्रीय प्रतीकांच्या सन्मान,पर्यावरण रक्षण,वैज्ञानिक दृष्टिकोन,पारतंत्र काळात होऊन गेलेल्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल आदर बाळगून त्यांचा इतिहास स्मरणात ठेवणे ही मूल्ये संविधानातीलच आहेत.ज्यांच्या नेहमी आपण सन्मान केला पाहिजे असे मत पानपाटील यांनी व्यक्त केले.भारतीय संविधानात जसे हक्क आहेत तसे कर्तव्य देखील असल्याने त्याचेदेखील पालन आपण केले पाहिजे अशा आशयाचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.सांस्कृतिक समितीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर भूषण पाटील यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!