Homeक्राईमचोपडा शासकीय मुलींचे वसतिगृहातील  अल्पवयीन विद्यार्थिनी गरोदर.पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपीस अटक

चोपडा शासकीय मुलींचे वसतिगृहातील  अल्पवयीन विद्यार्थिनी गरोदर.पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपीस अटक

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपड्यात शिरपूर तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोपडा येथे दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले आहे . पीडित मुलीचे पोटदुखीमुळे  दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यावर  ती गरोदर असल्याची माहिती समोर आल्यानंतर   पीडितेच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी चोपडा येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्या अल्पव्यीन मुलीवर अविनाश वेस्ता पावरा याने जानेवारी २०२३ मध्ये चोपडा शहरातील शिरपुर रोडवरील एका हॉस्पिटलच्या मागे राहत असलेल्या पीडितेच्या मैत्रिणीच्या रुमवर चार वेळेस तसेच २६जून २०२५ रोजी सकाळी ११वा च्या सुमारास शिरपुर रोडालगत असलेल्या हरेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाडा झुडपां मध्ये पीडितेवर अत्याचार केल्याचे पिडीतेचे म्हणणे आहे.

या घटनेविषयी गृहपाल लता सरडे यांना विचारणा केली असता  त्यांनी टाळाटाळ करीत  कुठलीच माहिती दिली नाही.यामुळे घटनेची नेमकी जबाबदारी कोणावर आहे असे विचारणा केली असता या विषयी बोलायचे त्यांनी टाळले.त्यांनी यावर सांगितले की आमचे वरिष्ठ बोलतील.याघटनेबाबत बराच कालावधी होऊनही कोणीच वरिष्ठ अधिकारी न पोहचल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे .  याप्रकरणी  पिडीतेच्या तक्रारीवरून संशयित अविनाश वेस्ता पावरा रा.अंमलवाडी पोस्ट उमर्टी ता चोपडा जि जळगाव यांचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात सिसिएनटीएस २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४,६५(१)  सह बालकांचे लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा कलम सन २०१२ चे कलम ४,५(१)(२),६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  चेतन परदेशी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!